Notes For Readers


 शेक्सपिअर या विख्यात नाटककाराचा जन्म 23 एप्रिल 1564 रोजी झाला आणि मृत्यू 23 एप्रिल 1616 रोजी झाला. काही वर्षांपासून 23 एप्रिल हा दिवस "जागतिक पुस्तक दिवस' म्हणून अनेक देशांत साजरा केला जातो. वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम या निमित्ताने साजरे केले जातात. त्यामुळे हा दिवस "वाचक दिवस' म्हणूनही ओळखला जातो. वाचकांमुळेच ग्रंथांचे आणि लेखकांचे अस्तित्व अर्थपूर्ण होते. या पुस्तक दिवसाच्या निमित्ताने वाचकांच्या हक्कांचा पुनरुच्चार करण्याची गरज आहे.

 डॅनिएल पेन्नाक (Daniel Pennac) या फ्रेंच लेखकाने "द राइट्‌स ऑफ द रीडर' हे पुस्तक 1992 मध्ये प्रसिद्ध केले. त्याचे इंग्लिश भाषांतर सारा ऍडॅम्स या लेखिकेने केले. डॅनिएलने तयार केलेला "वाचकांच्या हक्कांचा जाहीरनामा' आपल्या वाचनसंस्कृतीच्या संकल्पनेच्या कक्षा रुंदावणारा आहे. वाचकांच्या हक्कांच्या या जाहीरनाम्यातील दहा कलमे पहिल्यांदा वाचल्यावर प्रथम त्यातील विरोधाभास, परखडपणा, रोखठोकपणा जाणवतो आणि हा वाचनसंस्कृतीचा पुरस्कर्ता आहे की विरोधक आहे, असा प्रश् न पडतो. वाचकांचा पहिलाच हक्क म्हणून तो चक्क "पुस्तक वाचण्याचा हक्क' असे सांगतो; पण त्याचाच पर्याय म्हणून पुस्तक न वाचण्याचा किंवा उडत उडत वाचण्याचा, शेवटपर्यंत न वाचण्याचा हक्कही पुढे ठेवतो! परंतु, जसजसा या दहा हक्कांचा थोडा खोलवर जाऊन आपण विचार करू लागतो, तेव्हा डॅनिएल वाचकांच्या हक्कांचा आग्रह धरताना वाचनसंस्कृतीच्या आणि वाचनप्रक्रियेच्या प्रभावासाठीच प्रयत्नशील आहे, हे लक्षात येते. पुस्तके म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवाही सातत्याचे, ज्ञानाचे, रंजनाचे, संवादसंपर्काचे, अनुभवांच्या संक्रमणाचे माध्यम म्हणून महत्त्वपूर्ण आहेत आणि वाचक हा या माध्यमाचा संवाहक आहे. या दृष्टिकोनातूनच डॅनिएलने या दहा हक्कांची सनद सिद्ध केली आहे.

डॅनिएलने मांडलेले वाचकांचे हक्क...

 

बहुसंख्य पुस्तके आता ई-बुक स्वरूपात उपलब्ध

 छापलेल्या पुस्तकांच्या तुलनेत ई-बुक्स बरीच स्वस्त

ई-बुकमुळे जागेची आणि पैशांची बचत

काही पुस्तके केवळ ई-बुक स्वरूपातच उपलब्ध

नव्या लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सोपा मार्ग

वीस लाखांहून अधिक पुस्तके अधिकृतपणे आणि निःशुल्क उपलब्ध

ई-बुकची आवृत्ती संपण्याची भीती नाही अनेक ई-बुक रीडर्सला शब्दार्थ पाहण्यासाठी डिक् शनरीची सोय

अंध व वृद्ध वाचकांसाठी आवाजाद्वारे ऐकण्याची सोय (इंग्रजी भाषेतच)

ई-बुकच्या माध्यमातून कागद वाचून पर्यावरणाचे रक्षण होते

किंडलसारख्या काही ई-बुक रीडरवर विशिष्ट बेवसाईवरून घेतलेलीच पुस्तके वाचता येतात

ई-बुक्स म्हणजे स्कॅन किंवा कॉपी केलेली फुकट पुस्तके नव्हेत

ई-बुक्स विकत घेतलेल्या विशिष्ट उपकरणासाठी "लॉक' केलेली असतात

ई-बुक्स कॉपी किंवा प्रिंट करता येत नाहीत

इंग्रजीइतक्या मोठ्या प्रमाणावर मराठीसाठी ई-बुक रीडर्स उपलब्ध नाहीत